ताज्या घडामोडी

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे-पालकमंत्री नवाब मलिक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असताना सर्व धर्मगुरुंना सोबत घेवून व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरण 100 टक्के पुर्ण करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे. असे निर्देश राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्या चे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध विभागप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवासी आरोग्य अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.परदेशी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले की, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देवून तो राखीव ठेवल्यानंतर इतर बाबींसाठी पाणीसाठ्याचा वापर करण्यात यावा. असे सांगून त्यांनी आरोग्य, जिल्हा नियोजन, महावितरण, कृषी, पाणीपुरवठासह इतर विभागांचा धावता आढावा घेत विविध सुचना केल्या. बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्री नवाब मलिक यांनी 10 रुग्णवाहिकेचे फित कापुन उदघाटनही केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close