ताज्या घडामोडी

ओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी वरोरा येथील सर्वपक्षीय नेत्यांचे वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

स्व. सुप्रिया संजय कोकरे यांनी ओबीसीवादी चळवळीची 30 जुन 2010 रोजी स्थापना केली.सर्व राजकीय पक्ष व समाजातील सर्व ओबीसी बांधव यांना एकत्र आणत ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करणे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी ओबीसीवादी चळवळीची स्थापना करण्यात आली.ओबीसीवादी चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा निश्चय केला आहे.

विदर्भ प्रमुख मा.शरद तराळे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा येथे राधामिलन सभागृहासमोर असलेल्या खुल्या मैदानात सर्व पक्षीय नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.वृक्षारोपण करताना भूषण बुरीले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .मा.नगराध्यक्ष विलास टिपले, सुभाष दंदाडे, वैभव डहाने,बंडू डाखरे मुज्जमिल शेख,भूषण बुरीले,दीपक गोंडे,प्रवीण सुराणा,किशोर उत्तरवार सचिन मांडवकर यांनी वृक्षारोपण केले.या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत बदकी तालुकाध्यक्ष, धीरज लाकडे तालुका संघटक ,ओबीसीवादी चळवळ वरोरा यांनी यशस्वीपणे पार पाडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close