विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणाची कास धरावी

प्राचार्य खुशाल कटरे यांचे प्रतिपादन
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
संगणक शिक्षण मानवी जिवनाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अविभाज्य अंग आहे.
विद्यार्थ्यांनी ,नियमीत अध्ययनासह,संगणक साक्षर होणे गरजेचे असल्यामुळेच, संगणक शिक्षणाची कास धरावी.
असे प्रतिपादन प्राचार्य खुशाल कटरे यांनी,संगणक प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले.
प्रास्ताविक वेद कम्प्युटर चे संचालक चंद्रकांत पारधी यांनी सादर केले.

या प्रसंगी आर्या कम्प्युटर केंद्र संचालक श्री बोपचे,आदिवासी शिव विद्यालय डव्वा चे प्राचार्य एस.टी.गभने, प्रा.सी.बी.टेभंरे विचारमंचावर उपस्थित होते.
AICPE ही देशातील अग्रमानांकित संस्था असुन संस्थेच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात सर्वे करुण गोंदिया जिल्ह्यातील एक मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील वेद कम्प्युटर याला बेस्ट स्टार परफॉर्मन्स ऑफ द इयर म्हणुन गौरवण्यात आले तसेच बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणुन चंद्रकांत पारधी सर वेद कम्प्युटर संचालक तसेच देवेंद्र खरोले यांना अवॉर्ड आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथे वेद कम्प्युटर च्या वतीने बेस्ट स्टुडंट् अवॉर्ड देउन विद्यार्थांचे गौरव करुण गुणवंत विद्यार्थ्यांनचे कौतुक करण्यात आले.
तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित पाहुण्याचे स्वागत आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील विध्यार्धानी केलें.
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य श्री एस टी गभने आदिवासी शिव विद्यालय डव्वा यांनी आजच्या युगामध्ये संगणक हा विध्यार्धांसाठी वरदान आहे आणि संगणक शिकणे गरजेचे आहे ज्या प्रकारे अन्न वस्त्र निवारा हया तीनही वस्तू मानवासाठी गरजेच्या असतात त्याच प्रकारे आजच्या युगामध्ये कम्प्युटर शिकण्याची गरज विधार्ध्याना आहे.असे प्रतिपादन केले
तसेच आदिवाशी विकास हायस्कूल खजरी येथील प्राचार्य खुशाल जी कटरे सर यांनी सांगितले की सडक अर्जुनी येथे खजरी येथील विद्यार्थांना कम्प्युटर शिकण्या करिता जाणे येणे हे लांब होतें असल्यामुळें गावांतील विधार्ध्यांच्या मागणी नुसार , वेद कम्प्युटर चे संचालक यांनी खजरी येथे वेद कम्प्युटर चि एक ब्रांच सुरु करावी. विद्यार्थांना गावीच कम्प्युटर चे शिक्षण करणे सोईचे होईल असे सांगण्यात आले व वेळीं वेद कम्प्युटर चे संचालक चंद्रकांत पारधी यांनी आश्वासन दिलें की डिसेंबर महिन्यात वेद कम्प्युटर ची ब्राच सुरु करण्यात येईल असी घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमा मध्ये उपस्थित आदिवासीं शिव विद्यालय डव्वा चे प्राचार्य श्री एस. टी. गभने सर, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
गोरेगाव तालुक्यातील आर्या कम्प्युटर चे संचालक किशोर बोपचे ,प्रा. कु.सी. बी टेंभरे आदिवासीं विकास हायस्कूल खजरी , संचालक गौरव टेंभुरनिकर आय डी.सी.टी. कम्प्युटर नवेगावबांध यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आदिवासीं विकास हायस्कूल खजरी येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.