ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती वर्धापन दिना निमित्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.२६ नोव्हेंबर २०२१ : पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे “संविधान दिनानिमित्त व समितीचा
२६ नोव्हेंबर २०१८ स्थापना दिवसा चे औचित्य साधुन अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मंगरूळ (दस्तगीर) पोलीस स्टशनमध्ये समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मा.संघपाल उमरे सर, मा.मनिष गुडधे अमरावती विभागिय प्रमुख,ओंकार येंगल अमरावती जिल्हा प्रशिध्दी प्रमुख,कूंदन गजभिये भातकुली तालुका अध्यक्ष,अनिल कावरे,भातकुली तालुका उपाध्यक्ष,बाबारावजी इंगोले धामणगाव तालुका विभागिय प्रमुख,निखिल वाहणे चांदुर रेल्वे सचिव,धनराज खर्चान भातकुली तालुका सचिव,गजानन कांबळे ग्रामीण समन्वयक,विनायकराव विलायतकर निभोंरा बोडखा समन्वयक,विनोद शिंगणापुरे मंगरूळ समन्वयक,हेमंत सोनुरकर मंगरूळ समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.सुरजजी तेलगोटे साहेब सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर यांना संविधान व सन्मान पञ व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या वतीने सन्मान पञ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

सर्व प्रथम सर्व पोलीस स्टाफच्या उपस्थितीत “संविधान उद्देशिकाचे वाचन व संविधान शपथ” घेण्यात आली. या प्रसंगी निखिल वाहणे यांनी प्रास्तविक मध्ये समितीचे २६ नोंव्ह.२०१८ पासुनच्या समितीच्या कार्याची माहिती दिली.पोलीस विभाग व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करित आहे,समितीची रेस्क्यू फोर्स, कार्यकरी अधिकारी पोलीस विभागाच्या कोणत्याही अडचणीला सहकार्य व मदत करित आहे.व पुढेही सर्व महाराष्ट्रातील पदधिकारी करेल असे मनोगत समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले.सहायक पोलीस निरिक्षक मा.सुरज तेलगोटे यांनी याप्रसंगी समिती करित असलेल्या कार्याचे आभार मानले, आम्हाला शासकिय बंधने असल्यामुळे व आमची संघटना नाही आम्हाला उपोषण,मोर्चे काढता येत नाहि परंतु पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे पदधिकारी आमच्या साठी हे सर्व करित आहे.व पुढेही आमच्या पाठिशी असाव अशी अपेक्षा व्यक्त केली.या उपक्रमाचे पोलीस विभाग व सर्व स्तरावर कैतुक केले जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close