ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरी येथे धम्मभूमी आणि शांती नगर परिसरात टीम(नेफडो)तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

दिनांक५जून २०२१रोज शनिवारला ब्रम्हपुरी टीम(नेफडो)तर्फे ब्रम्हपुरी येथील विविध भागात वृक्षा रोपण करण्यात आले. धम्मभू मी आणि शांती नगर परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.यात आंबा,चिकू,आवळा,करंजी,कडुनिंब,पेरू,डाळिंब,जांभूळ ई.वृक्षाचे रोपण करण्यात आले. व ज्या भागात वृक्ष लावण्यात आले त्या वॉर्डातील नागरिक झाडांचे संवर्धन करण्यासाठी तयार झाले . त्याचप्रमाने दोन सदस्य आपल्या संस्थेत कार्य करण्यास प्रेरित झाले… कु.सपना मोरेश्वर राऊत,आणि श्री.बनकर सर आपल्या संस्थेत सहभागी होणार असल्याचे बोलले.🌱

विशेष म्हणजे ब्रम्हपुरी टीमचे सदस्य श्री .गाढवे सर यांनी ५वृक्षाचे रोपण केले.उपक्रसाठी नागपूर विभाग उपाध्यक्षा सौ. आचल राऊत उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष सौ.मीना बिंदुसार उपाध्ये तसेच सदस्य प्रा. दूलारि गाढवे सर,सनम टेंभुर्णे,किरण टेंभूर्णे,सौ. रजनी सुर्यवंशी मॅडम,सपना राऊत, ,तसेच वॉर्डातील सौ.गया टेभुर्णे,सौ.अवंतिका इंदुरकर,सौ.बनकर मॅडम,श्री,बनकर सर,सुमेध शेंडे,सोनू मेश्राम, प्राची टेभुर्णे,प्राजक्ता रामटेके,ओशीन उपाध्ये, ई.उपस्थित होते.सर्वांनी हिरीरीने उपक्रमात सहभाग घेतला व आमच्या चळवळीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.तसेच लावलेल्या वृक्षाचे जतन करण्याची हमी दिली.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

आज दोन नवीन सदस्य आपल्या संस्थेत सामील होण्यास प्रेरित झाले कू.सपना राऊत,आणि श्री.बनकर सर.त्यांचे आमच्या टीम तर्फे स्वागत आहे.
सौ.मीना बिंदुसार उपाध्ये
जिल्हा उपाध्यक्ष (नेफडो)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close