ताज्या घडामोडी

येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार

आमदार व महसूल प्रशासन आपल्या दारी या उपक्रमातून प्रलंबित कामे मार्गी लागतील – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक २२ जुलै गुरुवार रोजी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी “आमदार व महसूल प्रशासन आपल्या दारी” हा उपक्रम राबवून जनतेचे प्रलंबित प्रश्न अथवा मागण्या तात्काळ सोडवणे संदर्भात संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे प्रशासनातील सर्व विभागांच्या मुख्य अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
आमदार व महसूल प्रशासन आपल्या दारी या उपक्रमातून अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे विविध दाखले, रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, नवीन रेशन कार्ड देणे, श्रावणबाळ व संजय गांधी या योजना प्रभावशालीपणे राबविणे,मतदान कार्ड दुरुस्त करणे अथवा नवीन देणे, शेतकऱ्यांचा फेरफार, जिवंत ७/१२ मोहीम राबुन सातबारा वाटप करणे, शेत रस्ता संदर्भात तक्रारीचे निवारण करणे, कुळाच्या जमिनीचा प्रश्न सोडवणे, जमीन महसूल अधिनियम अंतर्गत संबंधित मंडळाधिकारी, पोलीस निरीक्षक, तलाठी यांच्या समितीसमोर प्रश्न ठेवून तो सोडवणे, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये आणणे, कृषी विभागाकडे प्रलंबित असलेले शेतकऱ्यांची सर्व प्रश्न मार्गी लावून, पंचायत समितीकडून जनतेस मिळणारा घरकुलांचा लाभ, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नारेगाच्या कामाचे नियोजन, नवीन जॉब कार्ड प्रधान करणे, पशुधन विकास अधिकारी व पशु तपासणी शिबीर राबविणे, भूमि अभिलेख कार्यालयाचे प्रलंबित प्रश्न, मालमत्ता पत्रके, प्रलंबित ७/१२ प्रकरणे निकाली काढणे, मोजणी प्रकरणे निकाली काढणे, पोषण आहार विषय प्रश्न, लसीकरण शिबिर राबवणे, वयाचे दाखले देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पोखरा, पिक कर्ज व इतर कर्ज प्रकरणे, एस.सी., एस.टी. साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळणे, आर.टी.ओ.कडून मिळणारा चालक परवाना, विद्युत महावितरण विषयक प्रश्न, गावातील आरोग्यविषयक प्रश्न तसेच गावातील रस्ता, नळयोजना, विंधन विहिरी चे प्रश्न, सामाजिक वनीकरण इत्यादी संदर्भात प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचा शोध घेऊन याबाबतची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावून सदरील लाभार्थ्याला त्याचा लाभ देण्यात यावा अशा सक्त सूचना यावेळी आमदार गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
“आमदार व महसूल प्रशासन आपल्या दारी” हा उपक्रम प्रभावीरीत्या राबवून येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी विविध विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे ३० हजारांपेक्षा अधिक दाखले संबंधित नागरिकांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सूचना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्‍न सोडून त्याचे दाखले संबंधित नागरिकांना निश्चित देण्यात येणार असल्याचे गंगाखेड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी हा उपक्रम प्रभावीरीत्या राबविल्याने मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close