सेवापूर्ती सत्कार समारोह तथा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मासळ बिटातील टेकेपार येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक शामदेव परसराम कुरडकर यांचे नियत वयोमांना नुसार सेवा निवृत्ती झाले आहे.
त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नुकताच दिनांक १० आगस्ट ला बालाजी रायपूरकर सभागृहात चिमूर येथे मान्यवरच्या उपस्थिती संपन्न झाला.
मुख्याध्यापक,शामदेव कुरडकर सेवानिवृत्त यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,जेष्ठ शिक्षक विनोद भोयर,प्रमुख पाहुणे म्हणून कंचर्लावार काकाजी,माजी केंद्र प्रमुख अशोक झाडें,केंद्र प्रमुख महल्ले सर, अनिवाड,मुकुंद जोगी,पल्लवी अभिजित काकडे,यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक,शामदेव कुरडकर व त्यांची पत्नी सौं नीता कुरडकर यांचा यथोचित सत्कार करून गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
या वेळी मान्यवर वेक्तीनी आपले मनोगत वक्त केले, संचालन सौं अर्चना विनोद भोयर, तर आभार प्रदर्शन सौरभ कुरडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी केंद्रातील अंतर्गत शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची ,आपतेष्ठ यांची प्रमुख उपस्थिती होती.