ताज्या घडामोडी

नेरी ग्रामपंचायत मधे येनारे अपंग बांधव 5 वर्षापासुन निधी पासुन वंचित

5 वर्षापासून थांबलेला 5 टक्के नीधी हा 7 दिवसाच्या आत वितरित करा अन्यथा ग्रामपंचायत सामोरं तीव्र आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षाने दिले संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर

नेरी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ मिळाला नसून मागील 5 वर्षांपासून दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित आहे यासंदर्भात मागील 5 वर्षाचा नीधी गेला कुठे यांची चौकशी करुन संबंधित अधीर्यावर कार्यवाही करुन 5 वर्षासहीत लाभार्त्यांना येत्या 7 दिवसात निधी उपलब्ध करून वितरित करण्यात यावे अन्यथा नेरी ग्रामपंचायत समोर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेतर्फे संवर्ग विकास अधिकारी यांना31 आगस्टला निवेदन देण्यात आले
सदर दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के निधीची तरतूद सरकारने केली असून ग्रामपंचायतीने हा निधी वित्त आयोग च्या आराखड्यात मंजूर केला असेल तर त्या निधीतून उपलब्ध करून लाभार्त्यांना वितरित केल्या जाते किंवा ग्रामपंचायत च्या सामान्य फडातून हा निधी उपलब्ध करुन लाभ दिल्या जाते किंवा ग्रामपंचायत या बाबत ठरविते ,दरवर्षी हा पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्ती ला वितरित करणे बंधनकारक आहे परंतु मागील पाच वर्षांपासून या निधीचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालाच नाही तेव्हा सदर ग्रामपंचायतीच्या हा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे अशीद अमरदीप मेश्राम आणि प्रवीण वाघे प्रहारसेवक यांनी अपंग दिव्यांग बांधवांना सोबत घेत सवर्ध विकास अधिकारी प ,स, चिमूर यांना निवेदन दिले सदर याबाबत अपंग दिव्यांगनी नेरी ग्रामपंचायत ग्रामसेवक नखाते यांना विचारले असता त्यांनी तुमाला काय पाहिजे ते लेखी अर्ज द्या नंतर आम्ही विचार करू असे सांगितले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close