ताज्या घडामोडी

देशातील प्रसिध्द संवरलाल ऑस्टीयोपैथी चँरिटेबल संस्था चंद्रपूरात करणार ऑस्टिओपॅथीची मोफत तपासणी

आ. किशोर जोरगेवारांचे आमंत्रण, डिसेंबर महिण्यात शिबिराच्या आयोजनाचे नियोजन .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

देशातील प्रसिध्द संवरलाल ऑस्टीयोपैथी चँरिटेबल संस्था आणि पाथकाइंड लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने जोधपूर येथे आयोजित आरोग्य शिबिराला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली यावेळी आ. जोरगेवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार जोरगेवार यांनी उपचार पध्दतीबाबत माहिती घेत सदरहु शिबिर चंद्रपूरात आयोजित करण्याचे आमंत्रण संस्थेला दिले आहे. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून डिसेंबर महिण्यात या शिबिराचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.
जोधपूर येथे आयोजित आरोग्य शिबिराला संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर पाराशर, डॉ. गिरिराज पाराशर, समाजसेवक भागीदार वैष्णव, उम्मेद राज जैन, माजी मंत्री राजेंद्र चौधरी, कोर कमांडर पीएस मनास, जयेश धुत यांची प्रमुखतेने उपस्थिती होती.
हाडांच्या आजाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. या आजारावरील उपचार पध्दती महागडी असल्याने सर्व सामान्यांना ती परवडण्यासारखी नाही. परिणामी अनेक नागरिक या आजारांमुळे वेदनादाई जिवन जगत आहे. दरम्यान आमदार जोरगेवार यांच्या वतीने शहरात आयोजित आरोग्य शिबिरांमध्येही हड्डीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपचार व्हावा यासाठी आमदार जोरगेवार यांचे विविध आरोग्य संस्थासह संपर्क सुरु होता. दरम्यान त्यांनी जोधपूर येथे जात देशातील प्रसिध्द संवरलाल ऑस्टीयोपैथी चँरिटेबल संस्थेच्या आरोग्य शिबिराला भेट देत त्यांची उपचार पध्दती समजून घेतली. गंभीर स्वरुपाच्या अनेक रुग्णांना या शिबिराचा फायदा झाला. पाराशर कुंटुबातील तिसरी पिढी हे सेवेचे काम करत आहे. त्यांनी अनेकांना हाडांच्या त्रासाच्या वेदनेतून मुक्त करत नवे जिवन दिले आहे. त्यांचे हे कार्य ईश्वरीय असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.
या हाड तपासणी शिबिराचा मुख्य उद्देश 25 वर्षांवरील लोकांची हाडांची घनता तपासणे हा असून त्यांना भविष्यात हाडांच्या आजारांपासून बचाव करणे हा आहे. हाडांची ताकद तपासण्यासाठी हाडांची घनता चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे हाडांची घनता तपासून त्यांची ताकद जाणून घेता येते. तपासणी अंती अहवालात हाडांमध्ये कमकुवतपणा आढळल्यास त्याची मूळ कारणे शोधून पुढील मार्गदर्शक सूचनाही देण्यात येतात. असेच आरोग्य शिबिर चंद्रपूरात आयोजित करण्या संदर्भात त्यांनी संस्थेला आमंत्रीत केले आहे. त्यांनीही आमदार जोरगेवार यांचे आमंत्रण स्विकारत चंद्रपूरात आरोग्य शिबिर घेण्याचे मान्य केले आहे. डिसेंबर महिण्यात या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन आता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जात असून चंद्रपूर जिल्ह्यसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता यावा असे उत्तम नियोजन करण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांना केल्या आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close