ताज्या घडामोडी

ईन्तेसार सिध्दीकी स्वगृही परतले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंगाखेड शहरातील अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले ईन्तेसार सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील हेव्यादाव्यांमुळे त्यांची घुसमट होत असल्याने त्यांनी काल दि. २३ ऑगस्ट सोमवार रोजी गंगाखेड शहरातील संपूर्ण मित्र परिवारासह आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात जाहीर प्रवेश केला. आमदार गुट्टे यांच्या बनपिंपळा येथील फार्महाऊसवर छोटेखानी परंतु अत्यंत थाटामाटात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ईन्तेसार सिध्दीकीसह प्रवेश करणारे इमरान सर, बाबा खान, शेर खान, बळीराम यादव, रहीम, मोसिन शेख, चांद शहा, सिराज, सय्यद अतिख, समीर चाऊस, वसीम शेख, सोहेल खान, गौतम, सेफ चाऊस, सलमान खान, अनिस यांच्यासह इतर १४५ पेक्षा अधिक प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी रासप जिल्हा अध्यक्ष ॲड. संदीप आळनुरे, गंगाखेड तालुक्याचे प्रभारी हनुमंत मुंडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, बापु सातपुते, अल्पसंख्यांक विधानसभा अध्यक्ष एक्बाल चाऊस,राजु खान यांच्यासह गंगाखेड शहरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close