ताज्या घडामोडी

तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरू झाल्याने पळसगांव वनपरिक्षेत्रा मधील आठ गांववासीयांच्या आशा पल्लवित

नागरिकांची अडचण दूर होणार,शेकडो ग्रामस्थ करतात तेंदूपत्ता संकलनाचे कामे

प्रत्येक तेंदुपुड्याला मिळणार २२७ रु भाव

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊन मुळे सर्व कामे ठप्प पडले आहेत.ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार बुडाला आहे.अशातच आज पळसगांव वनपरिक्षेत्रातील ८ गांवा मध्ये आज पासून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दोन महिन्यांपासून कुचंबना सुरू असताना,तेंदूपत्ता आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील लोकांना लॉकडाऊनच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.

पळसगांव वनपरिक्षेत्रतील जंगला लगत लागून असलेल्या पळसगांव पीपर्डा, पारणा, गोंडमोहाळी,बेलारा,विहिरगाव,मदनापूर,करबडा या गावातील मजूर वर्गाला रोजगार मिळाला आहे.जंगल परिसरतील भागात नागरिक मोट्या प्रमाणात तेंदूपत्ता संकलन करतात.त्या मुळे मागील दीड दोन महीन्यापासून घरी बसलेल्या लोकांना त्यांचा हाताला काम मिळाला आहे.शारीरिक अंतर राखून नागरिकांनी तेंदूपत्ता संकलन करण्याचे आव्हन वनविभागणी केले आहे.

प्रति तेंदूपुडयाला मिळतात २२७ रु प्रति शेकडा तेंदूपत्ता संकलन करिता २२७ रुपये मंजूर असून गावकरी स्व खुशीने तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.कोविड १९ च्या अनुषंगाने अटी व शर्ती नुसार तेंदूपत्ता संकलन करावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे.मात्र गावातील मजुरांच्या हाताला काम नाही.सदर कंपनीचे चेकर, मजूर हे जिल्ह्यातीलच आहेत.त्यामुळे सोशल डिस्टन ठेऊन तेंदूपत्ता संकलनाचे केंद्र सुरू झाले आहे.

सौ ,सरिता विकास गुरनुले
सरपंच ग्राम पंचायत ,पळसगांव

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये.या संदर्भात दक्षता घेण्याची वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना आहेत.खबरदारी घेऊन तेंदूपत्ता संकलन करण्यास काही अडचण नाही.कंत्राटदारानी मजुरांची काळजी घेऊन संकलन केंद्र सुरु झाले आहे.

श्री,आर एन ठेमस्कर
वनपरीक्षेत्र अधिकारी
पळसगांव वनविभाग

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close