खाद्य तेल पेट्रोल डिझेल वाढीवर भाजपा सरकारचा जाहिर निषेध

ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
नागभीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवस संकल्प दिनानिमित्त केंद्र सरकारच्या खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, व सिलेंडर गँस दरवाढी विरोधात नागभीड येथील मुख्य रस्त्यावर केंद्र सरकार विरोधात नारे देवुन जाहीर निषेध करण्यात आले . यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,मा.अँड.गोविंदरावजी भेंडारकर सिनेट सद्स्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा.किशोरभाऊ समर्थ माजी सरपंच ग्रा.पं.नागभीड ,रमेशभाऊ ठाकरे माजी ग्रा.पं.सद्स्य नागभीड,प्रतिकभाऊ भसिन नगरसेवक नागभीड, सौरभभाऊ मुळे तालुका कार्याध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी नागभीड ,काँग्रेस कमिटीचे जेष्ठ कार्यकर्ते मधूभाऊ बावणकर, संजयजी साखरकर सर, कमलाकरजी ठवरे सरपंच ग्रा.पं. बालापूर खु., युवा कार्यकर्ते नाशीरभाई शेख, हरीषभाऊ मुळे, महेशभाऊ कुर्झेकर, सुरजभाऊ चौधरी ग्रां.प.सद्स्य किरमीटी ,बबनभाऊ धारणे,मंगेशभाऊ देशमुख ,महेशभाऊ चौधरी,नंदेश्वर सातपैसे यांची उपस्थित होती.