३३ के.व्ही.उपकेंद्र कोद्री अंतर्गत सेलमोहा येथे नवीन फिडर वर विद्युत पुरवठा चालू
- आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते शेलमोहा येथे न्यू फिटर चे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून डोंगर भागातील सेलमोहा व माखणी फिडरला ३३ के.कोद्री सबटेशन वरून लाईट पुरवठा करण्यात येतो परंतु डोंगर भागातील शेलमोहा,अंतरवेली,उंडेगाव, कातकरवाडी,तांदुळवाडी,वागदरी, आनंदवाडी अशा इतर गावच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित मिळत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या या विद्युत पुरवठा या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांनी शेलमोहा येथे न्यू फिडरच्या कामास गती देऊन काम पूर्णत्वास नेऊन त्याचा आज उद्घाटन सोहळा पार पडला.
सेलमोहा येथे न्यू फिल्डर ला विद्युत पुरवठा व्यवस्थित पुरवठा केला जात असल्याने डोंगर भागातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा संदर्भात अडचणी सुटण्यास मदतच होणार आहे.
३३ के.व्ही. उपकेंद्र कोद्री अंतर्गत न्यू सेलमोहा फिटरचा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण अप्पा मुंडे, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, सरपंच संभूदेव मुंडे, सरपंच दत्ता गाडे, सरपंच नितीन खोडवे, डॉ.सूर्यकांत मुंडे साहेब, सरपंच शिवाजी चाटे, सरपंच सुशील केंद्रे, सरपंच शिवाजी कातकडे, सरपंच वैजनाथ तिडके, सरपंच सुभाषराव गरड, सरपंच श्रीमंत नागरगोजे, सरपंच रावसाहेब सानप, सरपंच तुकाराम चाटे, सरपंच भाऊराव मुंडे, विद्युत महावितरण कंपनी परभणी अधीक्षक अभियंता मा. अन्नछत्रे साहेब, कार्यकारी अभियंता परभणी मा. घोंगडे साहेब, उपकार्यकारी अभियंता गंगाखेड मा.मात्रे साहेब, सहाय्यक अभियंता गंगाखेड मा. फड साहेब यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.