श्री.रेणुका शुगर्स या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी आंदोलनासाठी चर्चा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी पाथरी येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परभणी जिल्हा सचिव कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली श्री.रेणुका शुगर्स या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली यावेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना अशी माहिती दिली की पुसद येथील साखर कारखाण्याचे असेच एक प्रकरण कोर्ट कचेरीत अडकले होते याबाबत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालून पुसद येथील कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावून त्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे.
त्यानुसार आपल्या रेणुका शुगर्स कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या गुरुवारी दिनांक 23/12/2021 रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे त्यानुसार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पाथरी तालुक्यातील एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाणार आहे.
त्या बैठकीत मा. सहकार मंत्र्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे आणि पुसद येथील कारखाण्याचा प्रश्न जसा मार्गी लावला त्या पद्धतीने पाथरी येथील रेणुका शुगर्स या कारखाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे.या बैठकीच्या नंतर पाथरी येथील कारखाना प्रशासनाशी याचिकेच्या विषयी सखोल चर्चा करण्यात आली यावेळी एचआर मॅनेजर श्री. शेख साहेब व एम.डी. श्री. पौळ साहेब उपस्थित होते.
तसेच येणाऱ्या 27 डिसेंबर 2021 रोजी सेलू कॉर्नर पाथरी येथे होणाऱ्या रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी पाथरी तालुक्यातील गावागावात जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत, या रास्ता रोकोसाठी पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केले आहे.
या बैठकीच्या वेळी तालुका सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर काळे, भाकप सोशल मीडिया सेल प्रमुख कॉम्रेड सुधीर कोल्हे, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड कैलास लिपणे, कॉम्रेड अरुण काळे, कॉम्रेड प्रशांत नखाते, कॉम्रेड नारायण दळवे, कॉम्रेड तुकाराम शिंदे, कॉम्रेड सुरेश नखाते, कॉम्रेड ओंकार नखाते, कॉम्रेड बाबासाहेब टेकाळे, कॉम्रेड शेख बडे साब, डॉ. राजेंद्र चौधरी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.