ताज्या घडामोडी

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध करून द्या

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार विभागीय आयुक्तांना दिले पत्र..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली जिल्ह्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीद्वारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील अंगणवाडी, शाळा दुरूस्ती, नवीन वर्ग खोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पथक इमारतींची दुरूस्ती व बांधकामे, पशु दवाखाने दुरूस्ती व बांधकामे, आरोग्य विभागातील औषधी साठा पुरवठा, 3054, 5054 अंतर्गत रस्ते दुरूस्ती तथा बांधकामे, साठवणुक बंधारे, ब्रिज वजा बंधारे, मामा तलाव दुरूस्ती च्या कामांकरीता निधी मंजुर करण्यात आलेला आहे.
त्याकरीता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजुर करण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने नियोजन करून कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून कामाच्या निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर मंजुर करण्यात आलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याकरीता प्रशासकीय मान्यतेसह जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवर आय पास द्वारे व पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. परंतु आजतागायत निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे विकासकामे प्रलंबित आहेत.या बाबीची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजुर करण्यात आलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close