योग्य पिढी घडविण्यासाठी ज्ञानाला संस्काराची जोड आवश्यक-सौ.भावनाताई नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शालेय जीवनामध्ये अध्ययना सोबतच नैतिक मूल्यांची शिकवणही मिळत असते, ज्ञान सोबत संस्कार रुजवने अत्यंत गरजेची बाब आहे म्हणूनच योग्य पिढी घडविण्यासाठी ज्ञानासोबतच संस्काराची ही अत्यंत आवश्यकता आहे असे प्रतिपादन सौ.भावनाताई नखाते यांनी केले
बुधवार दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी त्या अध्यक्षिय स्थानावरून बोलत होत्या.
याप्रसंगी पाथरी वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. अशोक गालफाडे यांचा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी च्या वतीने संस्थेच्या सचिव सौ.भावनाताई नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी आत्माराम कुटे,प.पू.चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालय गुंज चे मुख्याध्यापक दत्तात्रय गिरी, पाथरी वकील महासंघाचे अध्यक्ष ऍड अशोकराव गालफाडे, साई सेवा प्रतिष्ठान पाथरीचे संचालक विजय विरकर, मुख्याध्यापक नवनाथ यादव ,प्राचार्य किशन डहाळे, उपमुख्याध्यापक आर. जे. गुंडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य किशन डहाळे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी या नात्याने श्रीमती के.एच.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. आई-वडिलांचे विस्मरण होऊ देऊ नका या आशयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गिरी यांनी विचार मांडले,सैनिकांचे बलिदान, भानगड झाली रे दादा, उतार वयातील प्रेमाची व्यथा या सामाजिक आशयाच्या कवितांचे ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांनी सादरीकरन केले. चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षा समाजातल्या खऱ्या नायकांचा आदर्श घ्यावा असे विजय विरकर यांनी तर शिक्षणातून माणूस घडावा अशी अपेक्षा अशोक गालफाडे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
श्रीमती अमृता कांडुरे यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती जयश्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणीच्या सचिव सौ भावनाताई नखाते, याप्रसंगी प्रसिद्ध कवी आत्माराम कुटे, ऍड.अशोक गालफाडे मुख्याध्यापक दत्तात्रय गिरी ,विजय विरकर, मुख्याध्यापक नवनाथ यादव, प्राचार्य किशन डहाळे आदी उपस्थित होते.