ताज्या घडामोडी

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रसंताची जयंती

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

ग्रामजयंती चा मंत्र घ्या हो नवा!
देशात समता नांदवा !!
जगातील पहिले युगपुरुष ज्यांनी स्वतःची जयंती साजरी करू न देता गावाची जयंती अर्थात ग्रामजयंती साजरी करण्याचा संदेश दिला अश्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केलेल्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राठोड यांनी साफसफाई,स्वच्छता यावर भर देण्यात यावा असे राष्ट्रसंतांच्या जयंती प्रसंगी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अधी सेविका वंदना बरडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले, कि राष्ट्रसंतांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांच्या कार्याला हातभार लावून प्रसार आणि प्रचार करण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
आभार प्रदर्शन मीना मोगरे यांनी केले तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता मडावी, कुमरे परिसेविका,मिना मोगरे अधिपरीचारीका पपिता यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला सर्व अधिपरिचारिका, कक्ष सेविका, सफाई कामगार व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रवंदना ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close