ताज्या घडामोडी
गोल्ड मेडलिस्ट महेश अलोने यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देवून केला सत्कार
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी जवळील महागाव येथील सामान्य कुटूंबातील महेश शंकर अलोने हे गोंडवाना विद्यापीठातून आंबेडकर विचारधारा विषय घेवून उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना सदर विषयात गोल्ड मेडल प्राप्त झाले याबाबत आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला असुन अडीअडचनीच्या वेळी आपण मदत करु असे सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे, माजी उपसरपंच मारोती करमे, ग्रा.पं. सदस्या सौ. वंदना दुर्गे, चंद्राजी रामटेके, प्रमोद रामटेके, भीमन्ना पानेम, सोनू गर्गम, संगीता आत्राम, श्रीनिवास सिडाम, सदाशिव गर्गम, गुरुदास दुर्गे, प्रविण दुर्गे, रवी गंगाधरीवार, विनोद रामटेके व गावकरी उपस्थित होते.