ताज्या घडामोडी

निसर्ग संपत्तीचे करुनी संवर्धन, चला करूया वृक्षरोपण – ब्रह्मा कुमारी मीरा दीदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक २३ जुलै२०२२ वार शनिवार रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व जागतिक वसुंधरा दिवस तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष या त्री सूत्री चे औचित्य साधून विश्वभारती प्राथमिक शाळा परिसर सोनपेठ या ठिकाणी नगरपरिषद सोनपेठ मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या सहकार्याने पिंपळ, कडूलिंब, वड, वृक्ष रोपे वृक्ष लागवड ब्रह्मकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर (प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा सोनपेठ संचालिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. वाढत्या उष्माघातावर वाईट परिणाम प्रकृतीवर होत असल्याकारणाने येत्या आगामी काळात वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन हे काळाची गरज आहे झाडे लावूया झाडे जगूया !!! या प्रसंगी उपस्थित मान्यवर विश्वभारती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, शाळेतील सहशिक्षक कृष्णा सर शिंदे सर क्षीरसागर सर गुजराती मॅडम, सविता मॅडम, पुनम मॅडम ,येवतेकर मॅडम, मुळी मॅडम, जाधव मॅडम देशमुख मॅडम इत्यादी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close