ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक महानगर व सोनवणे अकौटन्सी क्लासेस तर्फे जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी:अहमद अन्सारी
नाशिक- ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर व सोनवणे अकौटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभाग सह संघटक व महानगर अध्यक्ष अँड. सुरेन्द्र सोनवणे, क्लासेसचे संचालक प्रा. श्री. उदय सोनवणे सर, महानगर सचिव अँड. राजेंद्र शेवाळे, आदर्श शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई पाटील, व संतोष गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राहक चळवळीचे जनक व ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर प्रा. भूषण दुसाने यांनी सर्वांचे स्वागत करून जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती सागितली. यावेळी विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कार्याची माहिती मिळण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रची माहिती व कार्यपुस्तिका महानगर सचिव अँड. राजेंद्र शेवाळे यांच्या हस्ते कलासच्या संचालकांना देण्यात आली.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आपल्या भाषणात ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे नाशिक विभाग सह संघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे यांनी जागतिक ग्राहक दिनानिम्मित दरवर्षी विविध विषयावर भाष्य करणारी थीम निवडली जाते. या वर्षाच्या ग्राहक दिनानिम्मित असलेली Digital the Finance या थीम बाबत व जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी व गरज याबाबत विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती सागितली. विद्यार्थ्यांनी तरुणांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे गरजेचे आहे. असे सांगून नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील बदला बाबत माहिती दिली. ग्राहकांनी आँनलाइन खरेदी व बँकिंगचे व्यवहार करतांना काळजी कशी घ्यावी, फसव्या जाहिरातींना बळी न पडता एक जागरूक ग्राहक बनून खरेदी करावी. असे सांगून फसवणूक झाल्यास काय करावे, याबाबत व ग्राहक पंचायतीच्या कार्याबाबत माहिती उपस्थित विध्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भूषण दुसाने यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. उदय सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक विभाग सह संघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे, क्लासेसचे संचालक प्रा. उदय सोनवणे सर, महानगर सचिव अँड. राजेंद्र शेवाळे, आदर्श शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई पाटील, श्री. संतोष गायकवाड, प्रा. भूषण दुसाने, अँड. विजया देवरे, श्री. विनोद अहिरे, श्री. भास्कर बोराडे, श्री. अमोल सूर्यवंशी, श्री.मनोज पाटील कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.