“वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती चारगांव बु.येथे संपन्न”
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ चारगांव बु.द्वारे ग्रामजयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते.पहिल्या सकाळच्या सत्रात ग्राम स्वच्छता आणि रामधुन काढण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात ग्रामगीतेतील तत्वज्ञान वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर भलमे ,कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. झाडे , छगनराव आडकिने,राजेंद्र थुल,विठ्ठलराव तुराणकार,अजय बगडे,डॉ. चाभारे यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा.विजय गाठले होते. यांनी तुकडोजी महाराजांना अपेक्षित असणारे माणूस घडवणारे जिवनशिक्षण मुलांना दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.त्यांनी राष्ट्रसंताच्या एकुण जिवनचरीत्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात ह.भ.प.गाडगे महाराज यांचे प्रबोधनपर किर्तन आयोजित करण्यात आले होते.या जयंती महोत्सवात बहुसंख्येने ग्रामवासी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश डाहुले यांनी केले तर आभार प्रदर्शन पिंटु सोनेकर यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनेने करण्यात आला.