धनराजभाऊ मुंगले यांची चिमूर तालुका व्यापारी महासंघ अध्यक्षपदी एकमताने निवड
ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माननीय सदानंदजी खत्री यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल सफारी येथे चिमूर तालुक्यातील व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री सदानंदजी खत्री यांनी चिमूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून माननीय धनराजभाऊ मुंगले यांची सर्वानुमते निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी बैठकीला संबोधन करून नवनियुक्त चिमूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माननीय धनराजभाऊ मुंगले यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री सदानंदजी खत्री जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष, विवेक पत्तीवार जिल्हा व्यापारी महासंघ सचिव, प्रकाश पानपट्टीवर जिल्हा व्यापारी महासंघ उपाध्यक्ष, प्रवीण सातपुते व्यापारी संघटना अध्यक्ष चिमूर, नीलम भाऊ राचलवार, सुरेशभाऊ पिसे, श्यामजी बंग उपाध्यक्ष व्यापारी महासंघ चिमूर, प्रमोद भाऊ बारापात्रे माजी व्यापारी मंडळ अध्यक्ष, सुरेशभाऊ कामडी नेरी व्यापार युनियन अध्यक्ष, स्वप्निल बघेल शंकरपूर अध्यक्ष, बबन बनसोडे, नागेंद्र चट्टे, योगेश ढोणे तसेच चिमूर ,नेरी, मासळ ,भिसी, जांभुळघाट, शंकरपुर येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.