मा. आमदार सौ.प्रतिभाताई बाळू धानोरकर यांनी संपूर्ण विभागातिल अधिकार्याना दिले निर्देश
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई (वरोरा)
दिनांक 12-06-2021 रोजी माननीय आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर यांचे अद्यक्षतेखली पंचायत समिती वरोरा येथे आमसभा पार पडली. त्यात ग्रामीण भागातील जनतेशी निगडीत 24 विभागवार चर्चा झाली. त्यात आमदार महोदयांनी संपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले की ग्रामीण भागातील कोनतीही योजना असो त्यात कोणताच गाव, तसेच कोणताही ग्रामीण भागातील लाभार्थी कोणत्याच योजनेपासूण वंचित रहता कामा नये. असे निर्देश संपूर्ण विभागाला आमदार महोदयांनी दिले.अनेक प्रकारची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यात घरकुलाचे प्रश्न असो, रस्त्याचे असो, अशी अनेक प्रकारची कामे मार्गी लागली. काही कामे 15 दिवसात मार्गी लागेल असे सांगण्यात आले. या आमसभेत पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचयत सचिव उपस्थीत होते.