गावकऱ्यांच्या भल्यासाठी तो युवा नेता करतोय उपोषण
आजचा उपोषणाचा तिसरा दिवस
चिमूर नगर परिषदेच्या अधिक-यांची उपोषणस्थळाला भेट
जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत उपोषण सुरुच राहील -अशिद मेश्राम
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गत तीन महिन्यांपासून झोपेचे सोंग घेणा-या नगर परिषदेने आपल्या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आपणांस उपोषणा सारखे हत्यार उपसावे लागले अशी तिखट प्रतिक्रिया चिमूर तालुक्याच्या काग गावातील युवा नेता तथा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.मागिल तीन महिन्यांपूर्वी आपण संबंधित विभागास निवेदन सादर केले होते.परंतु आपल्या निवेदनाची प्रशासनातील कुठल्याही जबाबदार अधिका-यांनी मागण्यांची नोंद घेतली नसल्याचा स्पष्ट आरोप
युवा नेता अशिद मेश्राम यांनी केला आहे.गावातील रास्त मागण्यांसाठी शेवटी आपणांस लाक्षणिक उपोषण करण्याचा मार्ग पत्करावा लागला असल्याचा तो म्हणाला. सोमवार दि.१९ फेब्रूवारी पासून काग मुक्कामी अशिद मेश्राम यांनी आपले लाक्षणिक उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा तीसरा दिवस आहे.दरम्यान नगर परिषद चिमूरचे अधिक्षक प्रदिप रमखाम व बांधकाम अधिकारी निखिल कारेकर यांनी काल संध्याकाळी ५:२० वाजताच्या सुमारास भेट देऊन अशिद मेश्राम यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा केल्याचे वृत्त आहे.दरम्यान या चर्चेतून एकाही मागणीची पूर्तता झाल्याचे दिसून आले नसल्याचे कळते.त्यामुळे मेश्राम यांनी आपले उपोषण जैसे थे ठेवले आहे.तीन महिण्या अगोदर निवेदन दिल्यानंतर ही नगर परिषदेच्या जबाबदार अधिका-यांनी काग गावातील मागण्यांकडे लक्ष पुरविले नाही.ही एक शोकांतिकाच आहे.गांव सुंदर व स्वच्छ दिसावे गावातील क्षुल्लक मागण्या त्वरित सुटाव्यात अशी उपोषण कर्ता अशिद मेश्राम यांची प्रामाणिक इच्छा आहे.परंतु या युवा नेत्यांच्या रास्त मागण्यांकडे आज पर्यंत नगर परिषदने लक्ष वेधले नाही.उपोषण मंडपाला काग-बाम्हणी येथील काॅंग्रेसचे माजी नगरसेवक अरूण दुधनकर यांनी काल भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले. यावेळी जनार्दन मेश्राम, रामजी धोंगडे,प्रतिक सोनटक्के, रामाजी मेश्राम, प्रफुल धोंगडे, रामभाऊ वाकडे उपस्थित होते.जो पर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत आपले उपोषण सुरू राहील असे युवा नेता अशिद मेश्राम यांचे म्हणणे आहे.