ताज्या घडामोडी
गोंडपिपरी _ आष्टी मार्गावर वैनगंगा नदी पुलिया जवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत म्हैस ठार
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दि.26 एप्रिल रोज मंगळवारला गोंडपीपरी – आष्टी मार्गावर वैनगंगा नदी पुलिया जवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.
अहेरी -चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर वाहनाची दिवस-रात्र वर्दळ सुरू असते.
आज सकाळ च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मैस ला धडक दिल्याने म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने जनावरे मोकाट फिरत आहेत. चारा आणि पाण्याचा शोधात मोकाट जनावरे वणवण भटकत असतात.
तर काही जनावरे आष्टि लगतच्या वैनगंगा नदी पात्रातिल थंड पाण्यात विसावा घेण्यासाठी येत असतात.दरम्यान सदर मार्गाने जनावरे जात असतानाच एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एक म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.