छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा मराठा सेवा मंडळच्या वतीने सुभाष रोड येथे संपन्न

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा चे आयोजन मराठा सेवा मंडळ परभणी च्या वतीने सुभाष रोड येथे करण्यात आले होते
या वेळी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यास मराठा सेवा मंडळ प्रदेश अध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून छत्रपतीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी फटाकेची आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांचा जोरदार जयजयकार करण्यात आला.
या वेगळी मराठा सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख यांनी शिवराज्यभिषेक दिन घराघरात साजरा करण्याचे आवाहन केले
मराठा सेवा मंडळ शहर जिल्हाध्यक्ष गोविंद इकर पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शिवराज्यभिषेक दिन का साजरा करावा या बदल माहिती दिली तर जिल्हाप्रमुख मंगेश भरकड यांनी सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मराठा सेवा मंडळ तालुका अध्यक्ष अंगद मस्के,कारभारी जाधव,रवि यंनावार, शुभम जाधव, शिवाजी माने, पिंटू भाऊ जाधव,संतोष माने,आमोल आबिलबादे.डीगाबर सावंत, बहिरट.आशोकराव कदम पाटील सतिश औढेकर, ऊमेश यरळकर.धर्मराज दलाल ,संतोष शहाने सर्व शिवराज्याभिषेक महोत्सव समिती सर्व सदस्य उपस्थित होते.