काळवीटाच्या शिंगांची तस्करी करणारे चार आरोपी वन विभागाच्या ताब्यात

कराड वनविभागाने केली कारवाई..
चार काळविट शिंगे व चार मोबाईल केले जप्त..
प्रतिनिधीःप्रमोद राऊत कराड
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार काळवीटाच्या शिंगांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल वराडे वनपाल व इतर वन कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून वारुंजी फाटा अन्नपूर्णा हॉटेल समोर काळवीट या वन्यप्राण्याची शिंगे जवळ बाळगून तस्करी करत असताना आरोपी रत्नाकर हनुमंत गायकवाड इस्लामपूर व अमर भगवान खबाले कराड यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता या तस्करीमध्ये अजून दोन व्यक्ती असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी इलाही सय्यद शेख व विशाल संभाजी शिंदे राहणार कराड यांना ताब्यात घेण्यात आले सदर आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या आरोपींकडून चार काळवीट शिंगे व चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत..सदर शिंगे ही त्यांना पाटण येथील रहिवाशी चंद्रशेखर निकम यांचेकडून मिळाली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे…सदरची कारवाई कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले पाटणचे वनक्षेत्रपाल आर एस नलवडे वराडे वनपाल सागर कुंभार मलकापूर वनपाल आनंद जगताप कोळे वनपाल बाबुराव कदम वराडे वनरक्षक सचिन खंडागळे मोपरे वनरक्षक शितल पाटील नांदगाव वनरक्षक अभिजीत शेळके महासोली वनरक्षक सुभाष गुरव कोळे वनरक्षक शंकर राठोड मलकापूर वनरक्षक कैलास सानप यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी केली आहे.. वन्य प्राण्यांची शिकार अथवा अवयवांची तस्करी करत असणाऱ्या व्यक्तींची टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.