ताज्या घडामोडी

एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

प्रतिनिधीःप्रा.विश्वनाथ मस्के

अंतिम मुदत 31 जानेवारी 2026

प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा 1 मार्च रोजी

चंद्रपूर दि. 19 : आदिवासी विकास विभाग, चिमूर कार्यालयांतर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कुल मध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. 1 मार्च 2026 रोजी प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत तसेच इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट ता. चिमूर येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा होणार आहे. ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, अशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक /मुख्याध्यापक यांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी या प्रकल्पाचे अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा. आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2026 आहे.
तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कुलमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम.व्ही.डुले यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close