ताज्या घडामोडी

गंगाखेड ते रावराजुर बस चार दिवसात सुरू होणार

सखाराम बोबडे यांच्या नेतृत्वाखाली प्रंवाशानी घेतली आगारप्रमुख यांची भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

संध्याकाळी सात वाजता गंगाखेड आगारातून सुटणारी रावराजुर बस येत्या चार दिवसात सुरू केली जाईल असे आश्वासन आगार प्रमुखांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दीले. सोमवारी या भागातील प्रवाशांनी आगार प्रमुख यांची भेट घेत निवेदन दिले.
गंगाखेड ते रावराजुर जाणारी सात वाजता सुटणारी बस यापूर्वी नियमित सुरू होती. कोरोना काळात ही बंद बस बंद करण्यात आली. आज घडीला बाजारपेठ ,शाळा पूर्ववत सुरू झाले असल्यामुळे प्रवाशांची रेलचेल वाढली आहे .या बसने मालेवाडी, वाघलगाव, मरडसगाव ,गोपा, रोकडेवाडी ,धनेवाडी, राजुर आदी भागातील युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानावर काम करणारे कामगार, हमाल आदी लोक ये-जा करतात. मार्केट सुटल्यानंतर घरी वेळेवर पोहोचता यावे यासाठी ही बस आवश्यक असतानाही ही बस बंद झाली होती. गावाकडे परत जायला बस नसल्यामुळे काही कामगारावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. ग्रामस्थ, प्रवाशांनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी भेटूनही ही बस सुरू करत नव्हते. प्रवासी मित्र पिंटू घोडबांड यांनी हि माहिती परभणी लोकसभा मतदार संघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवली. यावरून सोमवारी निवेदन देण्यात आले. आगार प्रमुखांनी ही बस येत्या चार दिवसात सुरू केली जाईल असे आश्वासन दिले. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे ,नारायण मामा सरोदे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिशे, पिंटू घोरबांड , चेअरमन सखाराम शिंदे, निवृत्ती शिंदे, दूध संघाचे अध्यक्ष कालिदास कदम, राजूभाऊ सूर्यवंशी, लक्ष्मण कदम, गजू शिंदे ,कृष्णा शिंदे, माधव ढवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close