ताज्या घडामोडी
खडसंगी येथे hp गॅस एजन्सीचे शुभारंभ
खडसंगी वासियांना 24 तास गॅस होणार उपलब्ध
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
खडसंगी वासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून केंद्र सरकारच्या नव्या धोरणनुसार मौजा खडसंगी येथे प्रियंका hp गॅस सलगनीत सेवा केंद्र / विक्री केंद्र हे csc सेन्टर खडसंगी चे संचालक श्री संजय मारोतराव रामटेके यांनी सुरु केलेले आहे गॅस पॉईंट चा शुभारंभ माजी सैनिक श्री रतन बन्सी साव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आता खडसंगी वासियांना 24 तास गॅस उपलब्ध होणार आहे या केंद्रावर नेहमी गॅस सिलेंडर असणार आहे रात्री अपरात्री सुद्धा आपल्याला बुकिंग करून गॅस सिलेंडर मिळणार आहे उदघाटन प्रसंगी रिता साव, सीमा रामटेके, राजू रामटेके व इतर गावकरी उपस्थित होते सदर सेवेमुळे गावात आनंदी व उत्साही वातावरण असून खडसंगी नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.