ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ट्युशन क्लासेस चे उद्घाटन

ट्युशन क्लासेस च्या संचालिका नेहा पठाण यांचा सत्कार व आर्थिक मदत..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी नगर पंचायत क्षेत्रांतील प्रभाग क्र. १३ मध्ये २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नेहा ट्युशन क्लासेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रभाग क्र. १३ मधील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी घरी आल्यावर घरी अभ्यास करत नाहीत मात्र ट्युशन क्लासेस मध्ये गेल्यावर अभ्यास करतात. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक पालक आपल्या पाल्याना चांगल्या दर्जेदार ट्युशन क्लासेस मध्ये पाठवू शकत नाही. त्यामुळे त्याच प्रभागात वास्तव्यास राहणाऱ्या नेहा पठाण यांनी ट्युशन क्लासेस सुरू केले असुन काल २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी कु. नेहा पठाण यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करून टूशन क्लासेस साठी लागणाऱ्या साहित्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी मंचावर अहेरी पंचायत समितिचे सभापती भास्कर तलांडे, रिजवान शेख, निवृत्त वनपाल गफ्फार सेवा, नितीन गुंडावार, सेवा निवृत्त चालक मतिन शेख, पत्रकार जावेद अली, ज्येष्ठ नागरिक अब्बास शेख, नैताम तसेच अहेरी शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, अजल शेख, साईनाथ औतकर, मिलिंद अलोने, सलाम भैया, विलास गलबले, प्रकाश दुर्गे, शाम ओडरे, निशार सय्यद, निखिल गुंडावार, प्रभागातील महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक हसन ताज मोहम्मद शेख यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close