ताज्या घडामोडी

गुरुद्वारा गुरुनानक आश्रम व बीर खालसा स्पोर्ट्स एंड कलचरल अकादमी द्वारे किसान आंदोलन समर्थन उपवास आंदोलनास आम आदमी पार्टी चे समर्थन व सहभाग

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

आम आदमी पार्टी कृषि बिल विरोधी आंदोलनावर कारवाई करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध!

आज दिनांक २३ डिसेंबर २०२० बुधवार ला संविधान चौक येथे “राष्ट्रीय शेतकरी दिन” चे औचित्य साधुन दिल्लीतिल शेतकरी आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी आज बीर खालसा संस्थेतर्फे उपवास आन्दोलना करण्यात आले. दिल्लीत किसान न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर आणि कडाक्याच्या थंडीमध्ये उपोषणाला बसलेले आहे. त्यांच्या समर्थनार्थ देशभर भुखहडताल , उपोषण विविध संघटनांनी व राजकीय पक्षांनी समर्थन केलेले आहे. आज नागपूर मध्ये खालसा ग्रुप कडून एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या आन्दोलनला आज आम आदमी पार्टी कडून दिवसभर सहभाग घेवून समर्थन केले. केंद्र सरकार द्वारे आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन फारच लांबत चालले आहे, कारण सरकार शेतकरी किंवा सामान्य जनतेच्या हिताचे नसून केवल अदानी अम्बानी साठी काम करात आहे.. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज २८ दिवस पूर्ण झालेले आहे तरीसुद्धा शेतकरी संघटना आणि सरकार ह्यांच्या मध्ये अजूनपर्यंत कायदे परत घेण्याविषयी कुठलाही तोडगा निघालेला नाही.

मुंबई। राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज आम आदमी पक्षाने महा विकास आघाड़ी मधील सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. काल मंगळवारी राज्यात कृषी बिलाच्या विरोधात आंदोलन होत असताना असे निदर्शनास आले की जणू महा विकास आघाडी सरकार हे केंद्र सरकार सोबत अंबानी – अडानी या उद्योगसमूहांना फायदा पोहोचविण्यास मदतच करत आहे.

एका आश्चर्यकारक घटनेमध्ये नागपूर पोलिसांनी महा विकास आघाडी सरकारचे एक मंत्री श्री बच्चू कडु यांना कृषी बिलांच्या विरोधात आंदोलन करताना ताब्यात घेतले. या कृतीवरून असे स्पष्ट होते की महा विकास आघाडी सरकार कृषि विधेयकांचे एक प्रकारे समर्थनच करीत असून स्वतःच्याच एका मंत्र्याला अटक करताना सरकारला काहीही गैर वाटले नाही किंवा श्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे नागपूर पोलिस विभागावर काहीच नियंत्रण नसून पोलिस अजूनही आरएसएस मुख्यालयाचे आदेश पळत आहेत.

खालसा ग्रुप च्या आयोजित एक दिवसीय उपवासाला (भूख हडताळ) पाठींबा देऊन त्यांचा समर्थनार्थ तसेच त्यांनी केलेल्या आवाहनाला आम आदमी पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिवसाच्या उपवासाला त्यांच्या बसले होते. या आंदोलनात आम आदमी पार्टी चे विधर्भ संयोजक व राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकुलकर, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, उत्तर नागपुर समन्वयक रोशन डोंगरे, गीता कुहीकर, प्रदीप पवनीकर, सचिन लोनकर, संजय सिंग, निखिल बेलवाडे, प्रशांत निलाटकर, प्रभात अग्रवाल, अमरीश सावरकर, अलका पोपटकर, विनोद अमलडोलकर, हरीश गुरुवानी, गिरीश तितरमारे, हरीश गुरबानी, बालू बनसोडे, निलेश गोयल, मयंक यादव, विशाल चौधरी, रजनी शुक्ला उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close