ताज्या घडामोडी

अम्रुत महोत्सवी आरोग्य मेळावा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात पडला पार

उपसंपादक :विशाल इन्दोरकर


अम्रुत महोत्सवी आरोग्य मेळावा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून प्रचार आणि प्रसार करण्यात आला सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी सर्वांना आवाहन केले की आपल्या मोबाईल वरुन एसएमएस आणि माॅसेज फेसबुक इत्यादी माध्यमांतून माहीती पोहचविण्यात आली.या साठी सर्वोंचा मोठा प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरूवात मगलमयी संगिताने केली . सकाळी ७.३० ला योगाचे आयोजन करण्यात आले होते.योगाला भरपूर प्रतिसाद मिळाला.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका व भुसे माॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.शैवटी सर्वांना टाळ्या वाजवून खदखद हसविण्यात आलें.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आता विश्वात्मके देवे या गिताने सांगता करण्यात आली.ठरलेल्या वेळेप्रमाणे मा खासदार धानोरकर साहेब यांचें आगमन झाले.पुष्पगुच्छ देवून मान्यवर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले आणि स्वागत गिताने सूद्धा स्वागत करण्यात आले मा आमदार धानोरकर माॅडम ह्याही अगदी वेळेवर हजर झाल्या.सर्वांचे स्वागत करण्यात आले.आरोग्य मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ किन्नाके आऊटरिच आर एम ओ‌ यांनी केले.मा धानोरकर माॅडम यांनी मार्गदर्शन केले.मा खासदार धानोरकर साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात आरोग्य मेळाव्याची माहीति दिली.कर्मच्यारांचे कौतुक केले.संचालन सौ सोनाली राईसपायले यांनी केले आणि आभारप्रदर्शन सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी केले.अधीसेवीका यांनी सर्वांना खदखदून हसायला भाग पाडले त्यांचे फायदे समजावून सांगितले तसेच जोरजोराने टाळ्या वाजवून त्यांचे फायदे समजावून सांगितले आणि सर्वांना कडून प्रत्यक्ष करून घेतलें.या कार्यक्रमाला सर्व च स्तरावरुन लाभार्थी आले होते.एकून ७००च्या जवळ लाभार्थींनी लाभ घेतला.तसेच सर्व स्पेशालिटी व कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनसाठी चहा नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. छान मंगल मयी वातावरणात आरोग्य मेळाव्याला प्रेक्षकांनाही खूप छान प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला सरपंच,तहसीलदार सभापती आमदार खासदार सर्वांनी उपस्थित दर्शविली.या मध्ये आरोग्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी गोल्डन कार्ड या मध्ये आरोग्य चि सर्व माहिती मिळाली (पांच लाख) या एका कार्डवर पाच लाखांपर्यंत लाभार्थी ला लाभ मिळणार आहे कार्ड देवून लाभार्थी यांना डॉ साठे यांनी माहिती दिली.स्वागत गीत
हरमोनियम = एलिंस सिमोन
तबला = उमाकांत जवादे
गायक = प्रमोद मशाखेत्री
सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका अंकिता लोखंडे अधीपरीचिरी ,आश्विनि बागडे अधिपरीचारीका ,जोशिला अधीपरीचारीका ,मनीषा कड़व, प्रियंका रॉय स्वाती अडगुलवार कर्मचारी वर्ग तसेच डॉ राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉ मूंजनकर तालुका अधीकारी सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका श्री तुमराम , श्री मडावी यांनी माॅनेजमेंन्ट साभाळले.मोबाईल यूनीट वर श्रीमति पुसनाके, श्रीमती कोंडापे , श्रीमती कापटे , श्रीमती कुमरे ,रुयीकर रुबीना खान सर्वांनी खुप मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close