महाराष्ट्रराज्य ग्राम पंचायत युनियन च्या वतीने चिमुर चे आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत युनियन तालुका चिमुर र.न.४५११ च्या वतीने मा. बंटीभाऊ भांगडीया यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये युनियनच्या वतीने आमदार यांना सांगण्यात आले की, चिमूर पंचायत समितीअंतर्गत बऱ्याच ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचे मागिल काही महिन्यापासून शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायतीची हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिलेली नाही ग्राम पंचायती सचिव ( सर्व ) वेतन व इतर लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे . त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे .अश्या परीस्थित तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी यांना दिवाळीपूर्व सदर धकीत असलेली रक्कम मिळाल्यास त्यांची व त्याच्या कुटुंबाची दिवाळी साजरी करता येईल नाहीतर दिवाळी अंधारात जाईल . तेव्हा विनंती आहे कि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्व सानुग्रह अनुदान राशी व मागील काही महिन्याचे शासन वेतनाचे अनुदाना व्यतिरिक्त ग्राम पंचायतीची हिश्याची वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्याची रक्कम तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम तक्ताळ अदा करण्यात यावी तसेच नवीन वाढीव वेतन अनुदान अदा करण्यात यावे . या करीता आपले स्तरावरून प्रयत्न करून सहकार्य करण्यात यावे असे निवेदन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना देण्यात आले.
आमदार साहेबाना ग्रा. प. कर्मचारी याच्या समस्या विषयी निवेदन देताना ग्रा. प. कर्मचारी यूनियन तालुका चिमुरचे सचिव किशोर कामडी व सदस्य दीपक लांजेकर, भीमराव गुरनुले ,विपिन गराटे, कृष्ना ढोले, घनशाम लोथे , जावेद शेख व इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी आमदारांशी प्रलंबित लाभविषयी चर्चा करण्यात आली व आमदारांनी विषय लवकर निपटारा करु व मा ग वी अ यांचेशी प्रधन्याने चर्चा करुण समस्या मार्गी लावण्या विषयी आश्वासन दिले.