के. के. एम. महाविद्यालयाच्या दोन स्वयंसेवकांची राज्यस्तरीय ‘आव्हान’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 18 जानेवारी 2026 :
येथील के. के. एम. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विभागाच्या दोन स्वयंसेवकांची अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय ‘आव्हान’ आपत्ती व्यवस्थापन शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारे हे शिबिर आपत्ती व्यवस्थापनाच्या खडतर प्रशिक्षणासाठी ओळखले जाते. या शिबिरात राज्यातील निवडक स्वयंसेवकांना पूर, भूकंप, आग, अपघात यांसारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी बचाव व मदतकार्य कसे करावे, याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
या शिबिरासाठी के. के. एम. महाविद्यालयाच्या कु. दिशा पाईकराव,बीए द्वितीय वर्ष, कृष्णा चिंचाणे बीकॉम द्वितीय वर्ष या दोन स्वयंसेवकाची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची आवड, शिस्तबद्ध कार्यशैली व उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. ही निवड महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सचिव बालकिशन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य के. जी. हुगे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे, डॉ. कैलास बोरुडे (IQAC), स्टाफ सेक्रेटरी डॉ. पंडित लांडगे, कार्यक्रमाधिकारी व समन्वयक प्रा. सुनीता कुकडे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या स्वयंसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.









