ताज्या घडामोडी

उमरा सोसाटीवर राष्ट्रवादी चे वर्चस्व कायम

पँनल प्रमुख जि.प.चे माजी सभापती सुभाषराव कोल्हे यांची एकहाती सत्ता.

आमदार बाबाजाणी यांनी केला सर्व संचालक मंडळाचा सत्कार.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील उमरा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत जि.प.चे माजी सभापती सुभाषराव कोल्हे यांची रणणनीती यशस्वी झाली.येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्यासर्व १३ संचालक विजयी झाल्याने या सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी या संचालक मंडळाचा सत्कार केला.
उमरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.एस.गवारे यांच्या नियंत्रणात येथील निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून १० संचालक निवडीसाठी २१ नामनिर्देशन आले होते.तर विमुक्त जाती भटक्या जमाती आणि अनुसूचित जाती, जमाती या दोन मतदारसंघात प्रतेकी एका जागेसाठी २ नामनिर्देशन आले होते तर ईतर मागासवर्गीय मतदारसंघात मात्र एकमेव नामनिर्देशन आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चे सखाराम हजारे यांची जागा बिनविरोध निवडली गेली.
१२ संचालक निवडीसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.१० एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.यामध्ये ६३४ मतदारांपैकी ५६९ मतदारांनी भाग घेतला.निवडणूक झाल्यानंतर निवडणूक नवनिर्वाचन अधिकारी एस.एस.गवारे यांनी मतमोजणी केली यामध्ये २५ मते बाद झाली.यामध्ये निवडणून आलेले सर्वच्यासर्व १२ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे मार्गदर्शनाखाली पँनल प्रमुख जि.प.माजी सभापती सुभाषराव कोल्हे यांची रणणनीती यशस्वी झाली ते स्वतः या निवडणुकीत विजयी होऊन सर्व संचालकांना विजय मिळवत या सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.यानिकालानंतर पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी सर्व संचालकांचा सत्कार केला.या संचालक मंडळात सुभाषराव कोल्हे,अंकुश कोल्हे,कालीदास कोल्हे,राधाकीशन कोल्हे,रामेश्वर कोल्हे,शरद कोल्हे,विशाल कोल्हे,विठ्ठल कोल्हे,दमयंती कोल्हे,प्रतिमा सोळंके,साहेब बिटे,दत्ता कांबळे यांचा सामावेश आहे.
आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेत विशेषत्वांने लक्ष देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचा सत्कार केला त्यानंतर आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close