जलशुद्धीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी प्रहारचे पाण्याच्या टाकीवर चढुन विरुगिरी आंदोलन
= प्रहारसेवक प्रवीण वाघे व शेरखान पठाण यांच्या नेतूत्वात विरुगिरी आंदोलन
= पाच तास होऊनही कोणत्याही अधिकारी वर्गानी भेट दिली नाही
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी येथील दुषित पाणी पुरवठा व पाण्याची टंचाई व बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र तसेंच पाण्याची टाकी सुरू करण्यासाठी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी दि 28 एप्रिलला प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रहार सेवक प्रवीण वाघे व शेरखान पठाण यांच्या नेतूत्वात पाण्याच्या टाकीवर चढुन विरुगिरी आंदोलन केले असून जोपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्याचे संबंधित विभाग लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत अन्न पाणी न घेता विरुगिरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रहार सेवकांनी केला होता.
सविस्तर वृत्त असे की मागील अनेक वर्षांपासून नेरी शहराला पाणी टंचाई ची समस्या आहे नेहमी दूषित पाणी पुरवठा सुरू असते त्यामुळे नेरी ग्रामपंचायतींनी अनेकदा पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडे मागणी केली असता महाराष्ट्र प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण मंजूर होऊन कामाला सुरुवात होऊन कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण झाले परंतु अजून पर्यत ह्या दोन्ही वास्तू शोभेच्या वास्तू म्हणून उभ्या आहेत तसेच ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठानेरी वाशियाना सुरू आहे ती टाकी अजीर्ण झाली असून साफ स्वच्छता कधीच झाली नाही आहे आणि या नवीन जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाकीतून अजूनही पाणी पुरवठा सुरू झाला नाही मागील 2 वर्षापूर्वी या जलशुद्धीकरण व टाकीचे ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्यात आले हे हस्तांतरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गुंतीवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले ते यावेळी ग्रामपंचायत नेरी चे प्रशासक म्हणून कारभार पाहत होते पाणी पुरवठा सुरळीत सुरू करून देतो असे म्हणून सर्व पक्षीय बैठक घेऊन व नव्याने निर्वाचित सदस्यांना बोलावून हस्तांतरित प्रकिया पूर्ण केली परंतु अजून पर्यंत जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजना सुरू झालीच नाही याला पूर्णता विस्तार अधिकारी गुंतीवार जवाबदार आहेत असे आंदोलनकर्त्यांनी व नागरिकांनी बोलून दाखविले आहे त्यामुळे नेरीत दूषित पाणी पुरवठा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
प्रतिक्रीया ….
सदर बाबतीत नेरी ग्रा प ला अनेकदा निवेदने अर्ज करूनही विचारणा केली असता त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि याबाबत संबंधित विभागाला विचारणा सुरुअसल्याचे व पत्रव्यवहार केल्याचे सांगितले आहे परंतु अजूनही पाणी पुरवठा सुरू झाला नाही तेव्हा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करा व जलशुद्धीकरण सुरू करन्यासाठी प्रहार तर्फे ग्रा प निवेदन देण्यात आले परन्तु या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली त्यामुळे प्रहरसेवक प्रवीण वाघे व शेरखान पठाण यांनी आक्रमक आंदोलनास सुरवात करीत पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सकाळी 10 वाजता पासून सुरू केले अन्न पाणी न घेता घोषणा बाजी करीत त्यांचे आंदोलन सुरू होते परंतु 3 वाजेपर्यंत कुठल्याही अधिकारी वर्गानी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली नाही तळपत्या उन्हामध्ये हे दोन्ही प्रहार सेवक टाकीवर चढुन आंदोलन करीत आहेत त्याकडे सर्वांचे दुलक्ष होत होते, अखेर पोलिस निरीक्षण मनोज गभने यानी पुढाकार घेत नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांना माहिती दिली, माहिती मिळताच नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यानी तातडीने भेट देत आन्दोलकांसी चर्चा करीत आंदोलन मागे घ्यायला लावले, तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आंदोलन कर्त्याची मागणी पूर्ण करावी अशी जनतेनी मागणी केली आहे.
प्रवीण वाघे प्रहार सेवक नेरी