परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुसान;एडीआरएफ च्या मदती सह पिकविमा द्या;वाघाळा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मागिल दोन तीन दिवसा पासुन परतीचा पाऊस धुँवाधार पडत आहे.या पावसाने खरीपातील काढणीला आलेले सोयाबीन,कापुस,तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले असून या पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना एनडीआरएफच्या निकशां नुसार मदत देऊन पिक विमा मिळऊन देण्या द्या अशी मागणी ई-पिक पाहाणी साठी आलेल्या परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल सुद गोयल यांना वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील आणि ग्रामस्थांनी बुधवार १२ ऑक्टोबर रोजी वाघाळा येथे निवेदन देऊन केली.
ई-पिक पहाणी साठी बुधवारी सकाळी ९:३० वाजता परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल सुद गोयल यांचा महसुल विभागा मार्फत दौरा होता. यात वाघाळा,रेणापुर, देवनांद्रा या तीन गावांचा ई-पिक पहानी साठी जिल्हाधिकारी आल्या होत्या. या वेळी वाघाळा बस स्थानकावर वाघाळा ग्रामस्थत मोठ्या संखेने उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिवन माणिकराव घुंबरे यांच्या शेताला भेट दिली. या वेळी ई-पिकपाणी अॅप मध्ये पिक पे-याची नोंद १५ ऑक्टोबर पर्यंत करण्याचे आवाहन शेतक-यांना करून या विषयी पुढील फायदे,तोटे सांगितले.
जिल्हाधिकारी रेणापुर कडे रवाना होत असतांना ग्रामस्थांच्या वतीने सरपंच बंटी पाटील,पदमाकर मोकाशे यांनी बसस्थानकावर जिल्हाधिकारी यांना पिक नुकसानी बाबत लेखी निवेदन देऊन ई-पिकपाणी अॅप मध्ये नोंदी होत नसल्याची तक्रार केली.खरीपात जुलै महिण्यात अती पावसाने पिके पिवळी पडली तर ऑगष्ट मध्ये पंचविस दिवस पावसाचा खंड होता. असे सांगत परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन,कापुस,तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले असून या पिकांचे पंचनामे करून दिपावली पुर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या वेळी पंचनामे केली जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे वाघाळा ग्रामस्थांनी सांगितले.