महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ने घेतला पुढाकार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी तांडा येथील शिक्षक व ग्रामस्थांनी मानले आभार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मानवत तालुक्यातील कुंभारी तांडा येथील महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा येथे शाळेला पाच हजार रुपयांचे शालेय साहित्य देण्यात आले या मध्ये शालेय साहित्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन फॅन व शिक्षकांसाठी एक ऑफिस फॅन देण्यात आले तसेच शाळेला सक्षम व विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी पेन वह्या व जनरल भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
यामध्ये महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक दिलीप चव्हाण व त्यांचे सहकारी माणिक राठोड तसेच क्रुष्णा चव्हाण, विकास चव्हाण यांनी या कार्यास आपले मोलाचे योगदान दिले
संस्थेच्या या कार्याबद्दल जिल्हा परिषद शाळा कुंभारी तांडा या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक संजय जाधव (मुख्याध्यापक) व दिनकर ढाकणे सर (शिक्षक) यांनी (सेवाभावी संस्था चालक) दिलीप चव्हाण व माणिक राठोड, कृष्णा चव्हाण, विकास चव्हाण, अमोल राठोड, अशोक चव्हाण, विनोद चव्हाण, सचिन जाधव यांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी नवनविन उपक्रम राबविण्यात यावे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायत मार्फत सक्षम बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे आव्हान ( दिलीप चव्हाण महाकाली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालक) यांनी नवयुवकांना तसेच ग्रामस्थांना सुचवले.