पाथरी विधानसभा मतदार संघातील टपाली मतपत्रिका कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला आढावा

पाथरी विधानसभा98
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मतदारसंघातील कर्तव्यावर उपस्थित राहणाऱ्या मतदान कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यावर कार्यरत कर्मचारी व इतर विधानसभा मतदार संघात जिल्ह्यात किंवा पर जिल्ह्यात निवडणूक कामासाठी कार्यरत असलेले परंतु पाथरी मतदारसंघात मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचारी ज्यानी फॉर्म नंबर 12 भरून टपाली मतदान करण्याची मागणी करून टपाली मतपत्रिका त्यांना उपलब्ध करून देणे व पाथरी मतदारसंघातील 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व 85 वय पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना ज्यांनी बीएलओ मार्फत घरबसल्या मतदान करण्यासाठी होकार फॉर्म भरून दिलेले आहेत त्या सर्वांची संख्या निश्चित करणे त्या नुसार टपाली मतपत्रिका प्राप्त करून घेणे त्याची सुरक्षा व गोपनीयता ठेवणे त्यासोबत विहित फॉर्म भरून घेण्याची कामे निवडणुकीतील टपाली मतपत्रिका कक्षामध्ये चालू असून या कामाचा आढावा श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी घेतला व कर्मचाऱ्यांना कामाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या यावेळी टपाली मतपत्रिका कक्षाचे प्रमुख श्री सुनील कावरखे तहसीलदार सोनपेठ तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री चंदेल नायब तहसीलदार सोनपेठ उपस्थित होते.