ताज्या घडामोडी

उमेद अभियान नागभिड द्वारा दिवाळी महोत्सव २०२१ चे आयोजन

प्रतिनिधी :रामचंद्र कामडी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून केले जाते. इंटेन्सिव्ह, सेमी इंटेन्सिव्ह व नान इंटेन्सिव्ह या कार्य पद्धती द्वारे अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गरीब गरिबीतून बाहेर पडू शकतो. त्यासाठी त्यास आवश्यक साहित्य दिले पाहिजे. या विश्वासातून दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ग्रामीण गरिबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम सभा उभारणे. गरीब वंचित महिलांचा समावेश स्वयंसहाय्यता गटामध्ये करणे. सदर संस्थेमार्फत गरिबांना एकत्रित करून त्यांच्या संस्थांची क्षमता, वृती व कौशल्य वृद्धी करणे, वित्तीय सेवा पुरवणे व शाश्वत उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे. याचाच एक भाग म्हणून नागभीड येथे दिनांक २७ ऑक्टोंबर २०२१ते ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राम मंदिर चौक नागभीड येथे मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान तालुका अभियान कक्ष नागभिड यांच्या सौजन्याने दिवाळी फराळ व साहित्य महोत्सव 2021 चे आयोजन केलेले आहे. खास दिवाळीनिमित्त नागभीड मध्ये प्रथमच स्वयंसहायता समूह निर्मिती विविध वस्तू व उत्पादने भव्य विक्री प्रदर्शनी व मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रदर्शनीमध्ये बाजार दरापेक्षा आकर्षक वस्तू स्वस्त दराने उपलब्ध. स्वयंसहाय्यता समूह निर्मित विविध वस्तू व उत्पादने, घरगुती उत्पादित पदार्थ, उत्तम दर्जाच्या कच्च्या मालापासून उत्पादित वस्तू, प्रदर्शनीमध्ये आपल्यासमोर ताजे पदार्थ, हस्तकला द्वारे तयार केलेल्या आकर्षक वस्तू, दिवाळी महोत्सव आनंतर उत्पादने व वस्तू वर्षभर तालुका विक्री केंद्रातून मिळणार आहे इत्यादी या महोत्सवाचे वैशिष्ट्य राहील. सर्वांनी सदर महोत्सव व प्रदर्शनी चा पुरेपूर आनंद घ्यावा असे आव्हान तालुका अभियान कक्षाचे मोहित टेकाम सर, अमीर सर, अमोल मोडक सर यांनी केलेले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close