ब्रम्हपुरीत महिलांचे ७७.११ टक्के मतदान

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
राज्यातील २०२४ विधानसभा निवडणुकीचे मतदानात ब्रम्हपुरी येथे लाडक्या बहिणींनी पुरुषांच्या तुलनेत जास्त मतदान केले आहे. पुरुष ७०.५७ टक्के, तर महिलांनी ७७.११ टक्के मतदान करून आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले.
विशेष म्हणजे ब्रम्हपुरी प्रत्येक मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट बनवण्यात आले होते. यामधून मतदारानमध्ये जनजागृती करण्यात आल. व मतदारांनी उत्साहाने सेल्फी पॉईंट मध्ये जाऊन आपले फोटो घेऊन आपला आनंद विविध सोशल मीडिया च्या माध्यमातून जाहीर केले.
ब्रम्हपुरीत कांग्रेसचे विजय वडेट्टीवार व भाजप चे कृष्णलाल सहारे यांच्यात थेट सामान असल्याचे मतदारांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले. महिलाची टक्केवारी जास्त असून महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला आहे की महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली यासाठी आहे हे बघण्यासारखे आहे. लाडकी बहीण कोणत्या भावाला विजयी करते हे बघण्यासारखं आहे.