नैसर्गिक हालचालींचा वेध घेत हवामानाचा अंदाज वर्तवतो-पंजाब डख
प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:-आज पर्यंत कुठल्याही वेधशाळेने असे अचूक अंदाज दिले नसतील तसे शेतकरी हिताचे अंदाज आपण उपग्रह आणि नैसगिक हालचालींचा वेध घेत शेतक-यांना मदत म्हणून १९९५ पासून आज तागायत हवामानाचा अंदाज जाहिर करत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी पाथरगव्हाण बु. येथे श्रीदुर्गा देवी मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलतांना व्यक्त केले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम बापूू घांडगे, नाना भाऊ देपाळी हे होते. या वेळी पुढे बोलतांना डख म्हणाले की पावसाचा अंदाच अगदी सहज सोप्या पद्धतीने स्वत:शेतकरी सुद्धा काढू शकतात सायंकाळच्या वेळेला आकाश लाल होणे,गाडी बैल रस्त्यावरील फुपाट्यात चिमनी आंघोळ करणे,वावटळी सुटने,सायंकाळच्या वेळेला घरात बल्ब जवळ किटक जमा होणे,रात्री अकरा नंतर साप बाहेर येणे अशा क्रिया होऊ लागल्या की समजायचं पाऊस ७२ तासात नक्की येणार,दव पडणे जोराचा वारा वाहाणे ही लक्षणे पाऊस न पडण्याची असल्याचे सांगून १५ ते ३० मे दरम्यान जेथे पावसाची थेंबे पडली त्या भागात पाऊस जास्तिचा होत असल्याचे ते म्हणाले.या सेबतच एल निनो आणि लानिना या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तत्पुर्वी श्रीदुर्गादेवी मित्रमंडळाच्या वतीने हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा साठी आयोजक इंजि. शाम घांडगे पाटील, ज्ञानेश्व घांडगे,भारत घांडगे,अंगद घांडगे,राजेभाऊ घांडगे,उद्धव घांडगे,सुनिल घांडगे,शेषराव घांडगे,श्रीहरी घांडगे,विठ्ठल घांडगे,अमर कवळे,महादेव घांडगे,दिगंबर घांडगे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमा साठी गावातील शेतकरी,महिला,ग्रामस्थ,बालगोपाळ मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते.