ताज्या घडामोडी

चंद्रपूरातील आदिवासी कोळी जमात राज्यस्तरीय महाआंदोलनाला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट; आंदोलनकर्त्यांशी केली चर्चा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्हा आदिवासी कोळी जमात यांचे राज्यस्तरीय महाआंदोलन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 23 जानेवारी पासून सुरू असून या आंदोलनाचा आजचा १२ वा दिवस आहे.आदिवासी कोळी जमात बांधवांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम 2003 नुसार कलम 3(4) मध्ये जात प्रमाणपत्र देताना अवलंब वयाची कार्यपद्धती देण्यात आली आहे तसेच केंद्र सरकारने 1976 च्या कायद्यात कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर या जमाती महाराष्ट्रभर असल्याचे सांगितले आहे परंतु एसडीओ त्यांना (नागरिकांना)आपण या जिल्ह्यातील नाही असे सांगून ऑनलाईन प्रकरणे दाखल करू नका असे बेकायदेशीरपणे सांगत आहे. ही एक शोकांतिका आहे .
दरम्यान जिल्हा बदल झाल्यास जात प्रमाणपत्र देताना कोणती कार्यपद्धती अवलंबावी ते 2003 कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे . राजूरा उपविभागीय अधिकारी यांनी नियमाचे पालन करावे. या शिवाय अन्य काही महत्त्वांच्या मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या १२ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू असून आज शुक्रवार दि. 2 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, चंद्रपूरचे तहसिलदार विजय अर्जुन पवार, तहसीलदार माचेवाड , तहसिलदार गोंड , चंद्रपूरचे नायब तहसिलदार राजू धांडे, महिला नायब तहसिलदार गीता उत्तरवार यांनी दुपारी 4:30 वाजता आंदोलन मंडपाला भेट दिली. भेटी दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचवेळी राजुराचे उपविभागीय अधिकारी माने यांच्यासोबत भ्रमनध्वनीवरुन चर्चा करून सेतू केंद्रामध्ये प्रकरण दाखल करण्या संदर्भात व जिवती तालुक्यातील सेतू केंद्रांना प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात लेखी पत्र देण्यास सांगितले. या शिवाय जिवती तहसीलदार
यांना देखील लेखी पत्र देऊन सहकार्य करण्यास सांगण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी आज संध्याकाळी बोलताना सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close