पत्रकार संरक्षण समिती कार्यकारिणीची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हा पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष पदी शेख अजहर हादगावकर तर उपाध्यक्ष पदी उद्धव इंगळे व ईपतेखार बेलदार तर सचीवपदी शेख सिकंदर बाभळगावकर यांची निवड करण्यात आली आहे .
हि निवड मराठवाडा अध्यक्ष अहेमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सदस्यांनी सर्वानुमते करण्यात आली. तसेच पाथरी तालुका पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी आयुबखान पठाण उपाध्यक्ष पदी सिध्दार्थ भदरगे व मो.इलीयास बागवान,मोहन जोशी सचिव महेश जोशी कोषाध्यक्ष तर कार्यकारी अध्यक्षपदी अनंत भदरगे उपकोषाध्यक्ष तर अन्वर अन्सारी सहसचीव पदी निवड करण्यात आली यावेळी मराठवाडा अध्यक्ष अहेमद अन्सारी परभणी जिल्हा अध्यक्ष अजहर हादगावकर उपाध्यक्ष उद्धव इंगळे , ईप्तेकार बेलदार जिल्हा सचिव शेख सिकंदर यांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आली