शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज भिसी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:विश्वनाथ मस्के
भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य शिरभये सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नितेश सर, प्रा. बोरकर सर, प्रा. मस्के सर व प्रा. इंदुरकर सर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी शाळेतील सर्व अध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल, शिस्त, सहशालेय उपक्रम तसेच पालक–शिक्षक समन्वयाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शिक्षकांशी नियमित संवाद ठेवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
पालकांनीही आपल्या समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. शाळा प्रशासनाने पालकांच्या सूचनांची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
एकूणच हा पालक मेळावा शाळा–पालक–विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा ठरला.









