धूळ नियंत्रणाकडे रस्ते निर्माण कंत्राटदाराचे दुर्लक्ष
धुळीमुळे आरोग्य चालले बिघडत .
ग्रामीण प्रतिनिधी: सुनिल गेडाम शिरपूर
चिमूर तालुक्यात सर्वच ठिकाणी नवीन रस्ते निर्माण करण्याचे कार्य मोठ्या जोमात सुरु आहेत. त्यापैकी नेरी ते शिरपूर बोथली रस्त्याचे काम सुरु असून त्यांच्याच कंपनीच्या जडवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. धुळीमुळे परिसरातील घरे व दुकानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. काही दिवसापूर्वी लोकांना देखावा करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारण्यात येत होते. मात्र आता बरेच दिवसापासून रस्त्यावर पाणी मारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर पाणी मारण्यास सुरवात करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नेरी ते तळोधी या रोडवर आता रहदारी जास्त वाढल्यामुळे जिकडे तिकडे धुळीचेच साम्राज्य पसरलेले असून नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर बंद न ठेवता पाणी मारणे सारखे सुरु ठेवावे असे सर्वजणमाणसात बोलल्या जात आहे.