आनंद निकेतन महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे तिनं दिवसीय लसीकरण शिबीर

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
शासनाच्या निदर्शनास सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले. तरी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना, महाविद्यालयानां लसीकरण अभियान सुरू करण्याचा निर्देशानुसार महारोगी सेवा समिती, आनंदवन. वरोरा. व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. संलग्नित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन. वरोरा. येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “उन्नत भारत अभियाना अंतर्गत” दिनांक २६ आँक्टोबर ते २८ आँक्टोबर पर्यंत असे तीन दिवस मंगळवार बुधवार गुरुवार covid- शील्ड ची लस सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या सभागृहात उपलब्ध आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी covid- शील्ड लस घेतलेली नाही किंवा दुसरा डोस त्यांना घ्यायचा आहे त्यांनी तीन दिवस लस घ्यावी व येताना सोबत आधार कार्ड आणि ज्या मोबाईल वर ओटीपी येईल असा मोबाईल सोबत आणावा असे आवाहन आनंद निकेतन महाविद्यालयाने केले आहे.
लसीकरण शिबिराचे उद्घाटन दिनांक २६ आँक्टोबर मंगळवार दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. बाळु मुंजनकर तालुका वैद्यकीय अधिकारी वरोरा, डॉ. आशिष देवतळे ग्रामीण वैद्यकीय अधिकारी कोसरसार, डॉ. प्राची रोडे ग्रामीण सिएचओ येन्सा, श्री. सुरेश वाते कृष्ठरोग तंत्रज्ञान तालुका आरोग्य कार्यालय वरोरा, आरोग्य सेविका श्रीमती. वंदना गजभे, आदित्य कडबे डाटा आँपरेटर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड, डॉ नरेंद्र पाटील, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. संजय साबळे, डॉ. प्रमोद सातपुते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक/स्वयंसेविका शुभम आमने, पायल कामळी, सोनाली दडमल, निकिता माणुसमारे, चेतन धांडे, संकेत कायरकर, उपस्थित होते.