ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सहकार्याने..आजारी व्यक्तीला घरी आणून पोहचविले..!!


तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येतील रहिवासी भानेश शंकर भोयर अंदाजित वय 40 या व्यक्तीचे तब्येत काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त असून . अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना अहेरी येते खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत अतिशय गंभीर असल्याचे यांना खासगी रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. गडचिरोली येथे खासगी रुग्णालयात तीन दिवस icu मध्ये ठेवण्यात आले. मात्र तब्येत पुन्हा अधिकच खालावली जात असल्याने खासगी रुग्णालयाचे डॉक्टर ने पुढे नेण्यासाठी सुचना केली. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुळे त्यांना जाणे शक्य नव्हते म्हणून. पुन्हा घरी परत जाण्याचे कुटुंबीयांनी ठरविले. मात्र घरी परत जाण्यास पर्यायी व्यवस्था व आर्थिक संकट उभे असल्याने घरचा एकमेव कमावता व्यक्ती संकटात असल्याने सर्व कुटुंब संकटात पडले होते.
ही सत्य परिस्थिती मोसम येथील पूर्ण वेळ आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास राऊत यांना कढताच लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना माहिती दिली. माहिती मिळताच लगेच यांनी आजारी व्यक्तीला घरी पोहोचविण्यासाठी ऑक्सिजन ऍम्ब्युलन्स वाहनाची व्यवस्था केली. अखेर आजारी व्यक्तीला घरी आणून पोहचविले.
त्याबद्दल अजय भाऊ कंकडालवार यांच्या बद्दल कुटुंबियांनी आभार व्यक्त केले…

नोट… अखेर जे घडले ते विचित्र कारण अहेरी खासगी रुग्णालयाततून रेफेर करुन गडचिरोली खासगी रुग्णालयात सतत तीन दिवस icu मध्ये असलेला व्यक्ती आणि डॉक्टर यांनी सुद्धा लास्ट स्टेज वर असल्याचे सांगितले कारण शरीरातील कोणतेही अवयव काम करत नव्हते तेव्हा कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबियांनी धीर सोडून आजारी व्यक्तीला गडचिरोली वरुण गुड्डीगुडम ला घरी ऑक्सिजन वर परत आणले.
सदर व्यक्ती भानेस शंकर भोयर..
घरी आणून सोडतच आजारी व्यक्तीचे हात पाय हालू लागले व शरीरातील सर्व अवयव हळूहळू काम करू लागले. आता सध्या परिस्थितीत तब्येत स्थिर आहे….

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close