ताज्या घडामोडी
ना. उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे लोकार्पण सोहळ्यासाठी वरोरा येथे आगमन
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2021/06/IMG-20210613-WA0113.jpg)
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
ना. उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांचा उद्या चंद्रपूर-गडचिरोली दौरा असून सोमवारला सकाळी नागपुर वरून वरोरा येथे शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर चे लोकार्पण सोहळा नियोजित स्थळी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान मंत्रीमहोदयांच्या उपस्थित पार पडणार आहे. यानंतर दहा वाजता उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असून त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी चंद्रपूर कडे रवाना होणार आहेत.